मो. रफी यांना संगीतमय ‘श्रद्धांजली’ ३ ऑगस्ट रोजी

0
मो. रफी यांना संगीतमय ‘श्रद्धांजली’ ३ ऑगस्ट रोजी

नागपूर (Nagpur):- लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांच्या 45 व्या पुण्यतिथी निमित्‍त एम.आर.के. म्युझिकल ग्रुप प्रस्तुत मुकेश, मो. रफी आणि किशोर कुमार यांना आदरांजली अर्पण करणारा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम ‘श्रद्धांजली’ रविवार, ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता, साई सभागृह, शंकरनगर येथे आयोजित करण्‍यात आला आहे.

या कार्यक्रमात विनोद दुबे, सरिता गडकरी, पुष्पा जोगे, बी. इंद्रकुमार वर्मा, मनीषा जावळीकर व जितेश बनोदे हे गायक कलाकार विविध गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्‍पना गायक राम खनगन यांची असून संगीत संयोजन परिमल जोशी व चमूचे आहे. गायक रमेश अय्यर कार्यक्रमाचे संयोजक असून सूत्रसंचालनाची धुरा मो. सलीम सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर आणि वाघमारे मसाले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या नि:शुल्‍क कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.