नागपूरकर आत्राम महू विद्यापीठाचे कुलपती

0

शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नागपूर. मूळचे नागपूरकर असणारे आणि नागपूरच्या शसकीय इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेंसिक सायंसेसचे संचालक डॉ. रामदास गोमाजी आत्राम (Director of Government Institute of Forensic Sciences Dr. Ramdas Atram) यांची महू येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती (Appointed as Chancellor of Dr. B. R. Ambedkar University of Social Sciences) करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली आहे. डॉ. आत्राम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या सीनेटचे सदस्यसुद्धा आहेत. नागपूरने अनेक कुलगुरू, कुलपती दिले आहेत. डॉ. आत्राम यांच्या कुलपतीपदी नियुक्तीने नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नियुक्तीनंतर डॉ. आत्राम यांनी आनंद व्यक्त केला आहे. आदिवासी युवकांना रोजगार मिळावा सोबतच स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने योग्य अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. विद्यापीठात कुलपती पदी नियुक्तीनंतर याकडे प्रामुख्याने लक्ष घालणार आहे. सामाजिक विज्ञानाशी संबंधित विषयांचे अपडेशन केले जाईल. अभ्यासक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांचा लाभ व्हावा, तसेच त्यामुळे रोजगाराच्या संधीही मिळाव्या, यावर भर दिला जाईल. आदिवासी समाजासमोरील अडचणी, आव्हाने माहिती आहेत. त्यांना समोर नेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे, ते चांगले माहिती आहे. त्यावरच प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

पालक पत्ता चाट आणि चायनिज भेल EP.NO 86|How to make crispy palak chaat Recipe|Chinese Bhel Recipe|

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा