नारेडको विदर्भ आयोजित RERACON 2.0

0

नागपूर (Nagpur) : रिअल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता, व्यावसायिकता आणि नितीमत्तेला नवीन दिशा देण्यासाठी नारेडको विदर्भ तर्फे RERACON 2.0 Evolve With RERA या महत्वपूर्ण परिषदेचे आयोजन आज चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले.
या परिषदेला महारेरा चे सचिव श्री प्रकाश साबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच महारेराच्या तज्ञ अधिका-यांची टीम महारेरा विशेष उपस्थित होती. सुधाकर देशमुख, चीफ रजिस्टी संजय नर्खेडे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, जितेंद्र जोशी आयटी मॅनेजर, हरीविजय शिंदे प्रशासकीय अधिकारी इत्यादी उपस्थित होते
या परिषदेत विदर्भातील बांधकाम व्यावसायिक, अभियंते, आर्किटेक्ट्स, चार्टर्ड अकाउंटंटस् आणि संबधित क्षेत्रातील तज्ञांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
RERACON 2.0 मध्ये खालील महत्वाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्प नोंदणी व अनुपालनातील अडचणी, आॅनलाईन प्रणालीतील सुधारणा व तांत्रिक सुविधा, प्रकल्प विलंब, तक्रारी आणि विवाद निवारण, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी उपाययोजना विदर्भातील संदर्भातील विशेष आव्हाने आणि उपाय इत्यादी महत्वाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
नारेडको विदर्भ चे अध्यक्ष डाॅ. कुणाल पडोळे यांनी स्वागत करताना म्हटले ही अडथळा नसून विश्वास निर्माण करणारी चैकट आहे. विदर्भाचा रिअल इस्टेट विकास पारदर्शकतेच्या पायावर उभा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
याा कार्यक्रमात नारेडको विदर्भ तर्फे हिटेश ठक्कर, डाॅ. कुणाल पडाळे, घनश्याम ढोकने, बादल मटे, सचिन मेहर, स्कायलब बनारे, विजय पाल, अच्युत गाडगे, सुनील राई आणि इतर सदस्य उपस्थित होते.