वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी दिले उत्तर

0

काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक

काँग्रेस(Congress)पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आता दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करत आहेत. आता काँग्रेस पक्षातील नेते आतंकी कसाबची बाजू मांडत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे .

अहमदनगर(Ahmednagar)लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील(Dr. Sujay Vikhe Patil)तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे(Sadashivarao Lokhande) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांनी दिला त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रचार सभेला मराठीतून सुरुवात केली.

काँग्रेसची बी टीम ॲक्टिव्ह झाली असून सीमेच्या पलीकडून ट्विट केले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्या बदल्यात काँग्रेसचे नेते पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यातून क्लीन चीट देण्याचे काम करत आहेत. मुंबईमध्ये झालेला 26/11 चा हल्ला पाकिस्तानने केलेला हल्ला होता. आपल्या जवानांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. हे सर्व जगाला माहिती आहे. न्यायालयाने देखील या विषयावर निर्णय दिला आहे. इतकच नाही तर पाकिस्तानने देखील दहशतवादी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. या दहशतवाद्यांचे फोन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. असे असताना

हा मुंबई हल्ल्यातील सर्व निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. हा मुंबई हल्ल्यात सर्व दहशतवाद्यांना मारणाऱ्या सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. शहीद तुकाराम वांजळे सारख्या सर्व शहिदांचा हा अपमान असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशाला कोणत्या बाजूला घेऊन जात आहे? असा प्रश्न देखील नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. तुष्टीकरण करण्याच्या नादात काँग्रेस आपली पातळी खाली आणत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अशा काँग्रेसला महाराष्ट्रात एक देखील जागा मिळायला नको, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.