राष्ट्रवादी नागपूर शहर तर्फे NMC च्या ‘घाणीच्या राजकारणा’ला चोख उत्तर!

0

NMC मुख्यालयाच्या प्रांगणातच कचरा फेकून राष्ट्रवादीचा ‘घाण-निषेध’!

नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागातील गंभीर निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध करत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर शहराने शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या आयोजनात मनपा मुख्यालयावर भव्य हल्लाबोल मोर्चा काढला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पारा चढल्याने, आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रांगणात आणि प्रवेशद्वारावर शहरातील कचरा फेकून अभूतपूर्व ‘घाण-निषेध’ केला.
मोर्च्यातील मुख्य कृती आणि प्रशासनाला ‘दुर्गंधी’ची जाणीव:
मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरभर पसरलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या तीव्र दुर्गंधीबद्दल प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रतिकात्मकरित्या तोंडावर मास्क परिधान केले होते.
श्रीकांत शिवणकर यांनी यावेळी NMC प्रशासनाला एक प्रतिकात्मक सिंगल यूज प्लास्टिक पैकेट भेट दिली. त्यांनी सांगितले की, “शहरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य असताना, मनपा प्रशासन ‘सिंगल यूज प्लास्टिक’वर बंदी घालण्यातही अपयशी ठरले आहे. या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून, आम्ही प्रशासनाला ‘सिंगल यूज प्लास्टिक’ने भरलेली पॅकेट्स भेट म्हणून दिली. प्रशासनाने ही भेट स्वीकारून आपला स्वाभिमान जागा करावा आणि तातडीने कठोर कारवाई करत प्लास्टिकवर कायमची बंदी घालावी आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करावी!”
NMC प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवते, हे आज सिद्ध झाले आहे. ज्यांना स्वच्छतेचे काम जमत नाही, त्यांनी खुर्च्या खाली कराव्या!”
मोर्चा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयुक्तांना निवेदन देत, तात्काळ प्रभावाने कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली.
अहिरकर यांनी इशारा दिला की, “मनपा प्रशासनाने जर दोन दिवसांत कचरा ठिकाणांचे सौंदर्यीकरण युद्धपातळीवर सुरू केले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे शहरात तीव्र जन-आंदोलन उभे करेल. NMC च्या भ्रष्ट कारभाराला आता जनताच रस्त्यावर उतरेल आणि धडा शिकवेल.”
यावेळी शहराध्यक्ष अनिल अहिरकर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश महासचिव तानाजी वनवे, महिला अध्यक्षा सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, ब्रह्मानंद मस्के, मुकेश रेवतकर, दिनेश रोडगे, राजेश समर्थ, अभिदत्त फाले, राजू मिश्रा, राकेश घोसेकर,चंद्रकांत (कल्ला) नाईक, संतोष भुजाडे, राजेंद्र भोयर, एकनाथ फलके, श्रद्धा राऊत,संजय जोशी,संदीप सातपुते, तुषार ढबाले, मुमताज बाजी, रवि वाठ, अविनाश पार्डीकर, ऋषी बोराटे, रीतेश लक्केवार,भारत ठाकरे, शोभा येवले, ज्योती कावरे, मनोज जरेल, शोभा येवले, रंजना खोब्रागडे, गौरव तिजारे, विशाल शेळोकर, दीपक लाडसे, अभिषेक पारधी, अनिकेत डोये, कपिल नारनवरे,रोहन नागपुरे, शाहनवाज, गोलू मेश्राम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.