पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाला पवारांचा विरोध?

0

(New Delhi)नवी दिल्ली– इंडिया आघाडीच्या बैठकीत काही नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी (Congress president Mallikarjun Kharge)काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रस्तावित केले होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही खर्गे यांच्या नावाला विरोध असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी “१९७७च्या लोकसभा निवडणुकीतही (आणीबाणीनंतर) पंतप्रधानपदाचा कोणताही चेहरा प्रोजेक्ट केला गेला नव्हता” असा दाखला पवारांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तसमूहाने दिले आहे. (Sharad Pawar`s reaction on Prime Ministerial Candidature)

पवार म्हणाले, “मोरारजी देसाई यांना निवडणुकीनंतर निवडणुकीनंतरच पंतप्रधान करण्यात आले होते. एखादा चेहरा प्रोजेक्ट केला नाही तर काही परिणाम होत नाही. जर लोक बदलाच्या मूडमध्ये असतील तर ते बदल घडवून आणण्यासाठी कौल देतील”.

दरम्यान, पवारांच्या या प्रतिक्रियेवर भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Mamata Banerjee)ममता बॅनर्जींनी मांडलेल्या खर्गेंच्या प्रस्तावावर काँग्रेसही खूश नव्हती, असा टोला त्यांनी लगावला आहे.