पोलिस लाईन टाकळीतील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती

0

अलंकार सभागृहाजवळ रस्त्याचे भूमिपूजन

नागपूर (Nagpur) :- पश्चिम नागपुरातील पोलिस लाईन टाकळी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर वेग मिळाला आहे. नागरिकांनी सतत उचलून धरलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तक्रारींची दखल घेत डॉ. वैशाली चोपडे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांनंतर आज अलंकार सभागृहाजवळील रस्त्याचे भूमिपूजन विधिवत पार पडले.

पोलिस लाईन मुख्यालय परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था लक्षात घेऊन सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डॉ. चोपडे यांनी मागणी केली होती. आंदोलन आणि उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत त्यांच्या प्रस्तावातील अनेक रस्त्यांपैकी तीन कामांना वर्कऑर्डर मंजूर झाली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ आज भूमिपूजनाने करण्यात आला. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, डॉ. वैशाली चोपडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. भाजपचे मंडळ अध्यक्ष अमर खोडे, गुड्डू शुक्ला, संध्या ठाकरे, जयहरीसिंग ठाकूर, मुन्ना ठाकूर, संजय मोहोड, गिरीश ग्वालबंशी, संतोष यादव, मयंक चिटमलवार, पारस कटोसिया, शारदा श्रीवास्तव, रेखा वांढे, रेखा दैने, शीला मोहोड, वर्षा जोसेफ, श्वेता ठाकूर, राजू राऊत, सोनू डकाह, कमलेश पांडे, राहुल नगरारे, राकेश शाहू यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी तत्काळ दखल घेऊन कामाला सुरुवात केल्याबद्दल डॉ. वैशाली चोपडे यांनी त्यांचे आभार मानले आहे. भाजपचे पदाधिकारी जयहरिसिंग ठाकूर, गिरीश ग्वालबंशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रस्ते कामाची मागणी केली होती. या विकासकामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होण्यासोबतच नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. पोलिस लाईन टाकळी परिसराचा मूलभूत विकास गतीने करण्यासाठी पुढील कामेही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.