पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांच्या जाहीर सभा

0
pm narendra modi
pm narendra modi

अहमदनगर, 5 मे (ahamadnag):- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पुढील आठवड्यात 13 मे रोजी(सोमवारी) मतदान होणार आहे.या मतदार संघातील महायुती भाजपा चे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात जोराने सुरू आहे.प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात महायुतीच्या वरिष्ठ दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi),उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रिय मंत्री नितिन गडकरी,ज्योतिरादित्य सिंधीया,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, आ.नितेश राणे,पंकजा मुंडे,धनंजय मुंडे यांच्या सभांनी वातावरण अक्षरश: ढवळून निघणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 7 मे रोजी (मंगळवारी) दुपारी4.30 वाजता नगर शहबरातील सावेडी परिसरात निरंकारी भवनशेजारील मैदानावर होणार आहे.8 मे रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दुपारी 4 वाजता सभा होणार आहे.तसेच सायंकाळी 6 वाजता राहुरी मध्ये तर रात्री 8 वाजता श्रीरामपूर धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे.9 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येणार असून जामखेड व कोपरगाव येथे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या साठी त्यांच्या सभा होणार आहेत.9 मे रोजीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत मध्ये दुपारी 4 वाजता व पारनेर येथील बाजारतळावर सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या जाहीर सभांमचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा चे युवा नेते आ.नितेश राणे हे देखील 9 मे रोजीच नगर जिल्ह्यात येणार असून ते पाथर्डी येथे रॅलीत सहभागी होणार असून तसेच शेवगाव येथे कार्यकत्र्यांच्या मेळाव्यात आ.राणे मार्गदर्शन करणार आहेत.10 मे रोजी भाजपा चे वरिषेठ नेते केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व केंद्रिय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योति रादित्य सिंधिया यांच्या जाहीर सभेचे श्रीगोंदा येथे सकाळी 11 वाजता सभा होणार आहे.भाजपा च्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे 10 मे रोजी पार्थी येथे जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत.11 मे रोजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजते भव्य रॅली व प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाचे दिग्गज नेते प्रचारासाठी नगर जिल्ह्यात येणार असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघणार असून भाजपा कडून या नेत्यांच्या सभा करिता जोरदार नियोजन केले जात आहे.

——–

५ मे सकाळच्या बातम्या

 

भूकंपाचे सौम्य धक्के बसले

हानी नाही पण खळबळ

उपराजधानी नागपूरला सलग दुसऱ्या दिवशी सौम्य भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के हानीकारक नसले तरी यामुळे खळबळ माजली आहे. काल, ३ एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. 2. 5 रिश्टर स्केलवर २.५ तीव्रता नोंदविण्यात आली. तर ४ मे रोजी २.५ तीव्रता नोंदविण्यात आली आहे. नागपुरलगतच्या शेजारच्या काही भागासह मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश मध्येही धक्के जाणवले.
————
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट
भाजप नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी ट्विट करत केला आहे. दरम्यान मोहित कंबोज यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
————

वंचित बहुजन आघाडीला जबर धक्का
​​​​​​​धुळ्याचे उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात स्वबळावर आपले नशिब आजमावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला धुळे मतदारसंघात जोरदार झटका बसला आहे. वंचितचे येथील उमेदवार अब्दुल रेहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. यामुळे प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वातील या आघाडीचे धुळे लोकसभा लढवण्याचे स्वप्न भंगले आहे. वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयपीएस अब्दुल रेहमान यांना उमेदवारी दिली होती. आता निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे.
———
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद

जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार

कर्नाटक भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओबाबत काँग्रेसने भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपा कर्नाटकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कथितरित्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या (एससी-एसटी) लोकांना धमकावले आहे की, त्यांनी एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान करू नये. एससी/एसटी समुदायाच्या सदस्यांविरुद्ध शत्रुत्व, द्वेष आणि दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले आहे.
———
ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती
आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे अनेकांची घरे कोलमडली आहेत. आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे धरणे, नद्या ही भरून वाहत आहेत. त्यामुळे आस पासच्या शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थिती पाहता गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे.