
नागपूर (Nagpur) दि. 12 नोव्हेंबर 2025:-
महावितरणतर्फे ११ केव्ही न्यू इंग्लिश स्कूल’ या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजल्यापासून ते दुपारी १:०० वाजेपर्यंत या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या कामांमुळे गाडीखाना, राममंदिर गल्ली. ओल्ड हिस्लाम कॉलेज गल्ली, गांधी गेट जवळील परिसर, टिळक पुतळा परिसर, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, नातिक चौक परिसर, आशिष एन एक्स परिसर, जोहरी पुरा परिसर चित्नवीस पार्क, प्लायवूड गल्ली, शारदा चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, ईश्वर फटाका परिसर, जलाल पुरा या भागातील वीजपुरवठा यावेळी बंद राहील.

ग्राहकांना विनंती:
वीज ग्राहकांना या तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरण (MSCB) क्षमस्व आहे. सर्व वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे आणि आपल्या आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.















