
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक झाले सामील,
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
चंद्रपूर(chandrapur)-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या लोकमान्य शाळेत तीन दिवस चालणारे अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन प्रारंभ झाले. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक सामील झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मॉडेल आणि पोस्टर प्रदर्शनीचे उत्साही उद्घाटन झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाल वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे असे सांगत गेली अनेक वर्षे संशोधनाच्या कार्यामध्ये मग्न असताना परदेशी संशोधनापेक्षा भारतात होणारे संशोधन अधिक सरस असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण आणि जेष्ठ वैज्ञानिक डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी केले.
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत न्यायचे आहे. त्यासाठी देशाचे दरडोई उत्पन्न वाढवावे लागणार असून हे शक्य करण्यासाठी विज्ञान-संशोधन याची कास धरावी लागेल. म्हणजेच विज्ञानाची शेती करावी लागणार असून बाल आणि युवा विज्ञान संमेलने हा टप्पा नावीन्यतेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे डॉ. जोशी म्हणाले.

















