
नागपूर, ११ नोव्हेंबर २०२५ : नागपूर शहरात उद्या, बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी महावितरण कंपनीतर्फे विविध उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा काही तासांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
या कामांमुळे महाल विभागात काळी ०९.०० ते सकाळी १०.३० पर्यंत ११ केव्ही उमरेड रोड वाहिनीवर केबल जोडणीचे महत्त्वाचे कामासाठी नंदनवन रोड, गुरुदेवनगर, मिरे ले आऊट, मंगलमूर्ती चौक, नंदनवन मेन रोड, कीर्ती स्वीट रोड आणि याला लागून असलेला परिसर. वाठोडा, शास्त्री नगर परिसरात सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत शास्त्री नगर वीज वाहिनीवर (वाठोडा शाखा कार्यालय अंतर्गत) एबी स्विच देखभालीसाठी गरोबा मैदान, शास्त्री नगर, कुंभार टोली, हिवरी ले आऊट, बाबुलबन, गीता भवन आणि परिसर. याव्यतिरिक्त, सिरसपेठ, गुलाबबाबा आश्रम परिसर, तुळशीबाग, रहातेकर वाडी, मांगपुरा, दसरा रोड, काशीबाई मंदिर परिसर, तहसीलदार मशीद, सी.पी. आणि बेरार कोलाज, नाईक रोड, भोसले विहार कॉलनी, गुजरवाडा, उपाध्ये रावड, कोठी रोड, हसनबाग, ननादनवन, एलआयजी, एचआयजी, एमआयजी कॉलनी, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्र नगर चौक, सन्मार्ग नगर, धनगवळी नगर, कॉर्पोरेशन कॉलनी, जवाहर नगर, खानखोजे नगर, दुर्गा नगर, बालाजी नगर, अयोध्या नगर, साई मंदिर, श्याम नगर, जयहिंद सोसायटी, सुरत सोसायटी, रुद्रशक्ती एन्क्लेव्ह, पितृ छाया सोसायटी, राजगृह सोसायटी, गीतांजली सोसायटी, सोमवार बाजार रोड, बेलतरोडी रोड, द्वारकापुरी, नाईक नगर, मित्र नगर, चंद्रा नगर, शुक्ला नगर, बँक कॉलनी, वंजारी नगर या भागांतील वीजपुरवठा देखील काही तासांकरिता खंडित राहणार आहे.
काँग्रेसनगर विभागात व्यंकटेश सिटी, पद्मावती नगर, सोमलवाडा दीनदयालनगर, त्रिमूर्तीनगर, यशोधरानगर या वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद राहील.
सिव्हील लाईन्स विभागात सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.००: लूंबिनी नगर, जुनी वस्ती मानकापूर, सेफ वे मोटर्स, दिल्ली हॉटेल, ताज नगर, संत ज्ञानेश्वर सोसायटी, अवध हॉस्पिटल, मानकापूर घाट परिसर, फरस रोड, रचना मधुबन, तवक्कल सोसायटी, शिव कृष्णा धाम, कृष्णा नगर, आझाद नगर, पंचशील नगर, मानवता नगर, गिट्टीखदान एरिया, मच्छी मार्केट लाइन, जीआयएस कॉलनी, उत्थान नगर, इंद्रायणी सोसायटी, इब्राहिम रिअल इस्टेट, धवन सेलिब्रेशन, गोरेवाडा, कडभी चौक, मेकोसा बाग, ख्रिश्चन कॉलनी, सिंधी कॉलनी, लुंबिनी नगर.सकाळी १०.०० ते दुपारी ०३.००: गड्डीगोदाम, मोहन नगर, खलासी लाईन, गणेश मंदिर, गजानन महाराज मंदिर परिसर, तेलंगणा रोड, सिपीडब्लूडी बंगला क्रमांक १८ आणि १९ व जुने क्वार्टर क्षेत्र परिसर. सकाळी ०८.०० ते दुपारी १२.००: पिवळी नदी, किला कंपनी, ऑटोमोटिव्ह चौक.
बुटीबोरी विभागात सकाळी १०.०० वाजल्यापासून एमआयडीसी सबस्टेशनमधील ११ केव्ही फीडर क्रमांक ३ (ब झोन) आणि ११ केव्ही फीडर क्रमांक ४ (ब झोन) प्रभावित एमआयडीसी क्षेत्र.
महावितरणचे आवाहन:
महावितरणकडून कळविण्यात आले आहे की, नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हे काम सुरक्षित आणि तातडीच्या वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असल्याने, सर्व वीज ग्राहकांनी सहकार्य करून आपल्या पाण्याची व इतर कामांची सोय वेळेनुसार करून घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे















