विविध शहरातील आगळ्या-वेगळ्या एकांकिकांनी घातली मोहिनी- मुख्यमंत्री महाकरंडक एकांकिका स्पर्धा

0

नागपूर, 26 नोव्‍हेंबर
राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या मुख्यमंत्री महाकरंडकं एकांकिका स्पर्धेत बुधवारी (दि. २६) विविध शहरांतील आगळ्या-वेगळ्या विषयावरच्या एकांकिकांनी नागपूरच्या रसिकांना मोहिनी घातली. बुधवारी स्पर्धेत सात एकांकिका सादर झाल्या. दीपप्रज्वलन आ. संदीप जोशी, अभिनेता राजेश चिटणीस, नागपूर दूरदर्शनचे सेवानिवृत्त कार्यक्रम प्रमुख अतुल भुसारी यांनी केले. यावेळी, रवींद्र भुसारी, प्रफुल माटेगांवकर, परीक्षक अशोक समेळ, शकुंतला नरे आणि डॉ. सतीश पावडे सर्व आयोजक उपस्थित होते.
बहुजन रंगभूमी, नागपुरतर्फे वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ एकांकिकेत श्रेयस अतकर, रोहित वानखेडे, अस्मिता पाटील, ऋषील ढोबळे, साक्षी नायगावकर, अभिषेक अरवाने यांनी अभिनय केला. पार्श्वसंगीत ऋषिकेश पोजगे, नेपथ्य अभिषेक अरवाने, प्रकाश योजना आर.वि. ढोबळे, रंगभूषा व वेशभूषा धनश्री खोब्रागडे यांची होती. रंगमंचीय व्यवस्था शशांक गवळी, स्पंदन वरघट, वैभव माकोडे, पियुष सोनवणे, वैष्णवी नांद्पुरे यांनी सांभाळली. चंद्ररथ थियेटर्स, नागपुरतर्फे चंद्रकांत चौधरी लिखित व यशवंत चोपडे दिग्दर्शित ‘दी डार्क एज’ या एकांकिकेत यशवंत चोपडे व भावना चौधरी यांनी अभिनय केला. निर्मिती प्रमुख म्हणून देवयानी चोपडे व चंद्रकांत चौधरी तर सूत्रधार म्हणून विलास कुबडे यांनी जबाबदारी सांभाळली. नेपथ्य देवयानी चोपडे व धर्मेंद्र चोपडे, प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे, संगीत अमित कुबडे, रंगभूषा व वेशभूषा भावना चौधरी व देवयानी चोपडे यांनी केल्या. निखील टोंगळे, प्रशांत खडसे, सचिन वंजारी यांनी सहकार्य केले. न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, मालेगाव, अहिल्यानगरतर्फे अपूर्वा काळकुंड लिखित व राखी गोरखा दिग्दर्शित ‘पिसाळा’ मध्ये तनिष्क भंडारी, सौंदर्या भोज, साईराज सरडे, रणवीर पालवे, अपूर्वा काळपुंड, अथर्व धर्माधिकारी, राखी गोरखा यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना चेतन ढोबळे, संगीत रणवीर पालवे, नेपथ्य तनिष्क भंडारी, रंगभूषा राखी गोरखा, वेशभूषा तनिष्का देशमुख यांच्या होत्या. नाट्यरंग, जळगावतर्फे अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शीत ‘गाईड’मध्ये अथर्व रंधे, सुहास दुसाने यांच्या भूमिका होत्या. नेपथ्य प्रणव जाधव, प्रकाशयोजना प्रथमेश जोशी, संगीत प्रणीत जाधव, रंगभूषा/वेशभूषा दिशा ठाकूर तर रंगमंच व्यवस्था पियुष भूक्तार, दर्शन गुजराथी, नेहा पवार, स्वप्नील गायकवाड, सुयोग राऊत यांची होती. माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन, बुलडाणातर्फे रवींद्र इंगळे चावरेकर लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित ‘नामदेव पायरी’मध्ये गणेश देशमुख व प्रसाद दामले यांच्या भूमिका होत्या. नेपथ्य पराग काकचुरे, प्रकाशयोजना लक्ष्मीकांत गोंदकर, संगीत विजय सोनोने, वेशभूषा आनंद संचेती, रंगभूषा डॉ. स्वप्नील दांडगे, रंगमंच व्यवस्था गणेश बंगाळे, तुषार काचकुरे, धनंजय बोरकर यांची होती. गंधर्व बहुद्देशीय संस्था, अमरावतीतर्फे दीपक नांदगावकर लिखित व दिग्दर्शित ‘लॉटरी’ व रसाभिनय, अहिल्यानगरतर्फे प्रतिक अंदुरे लिखित व दिग्दर्शित ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिका सादर झाल्या.


—————
आज आठ एकांकिका
मुख्यमंत्री महाकरंडकमध्ये अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि. २७) आठ एकांकिका सादर होतील. पडदा सकाळी ९ वाजता उघडेल. त्यानंतर अभ्रुणी, नागपूरतर्फे स्वप्नील बोहटे लिखित व दिग्दर्शित ‘दिव्यदान’, शुभारंभ थियेटर, अमरावतीतर्फे प्रवीण पाटेकर लिखित व शुभम ठाकरे दिग्दर्शित ‘भानगड’, वैभव दीपनाट्य संस्था, सोलापूरतर्फे दीपक शिंदे लिखित व दिग्दर्शित ‘प्रेम की यातना’, नाट्यदर्शन, छत्रपती संभाजीनगरतर्फे गोपाळ वाघमारे लिखित व दिग्दर्शित ‘बुजगावणं’, कलासक्त, मुंबईतर्फे सारिका ढेरंगे लिखित व योगेश कदम दिग्दर्शित ‘पेंडूलम’, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावतर्फे सतीश वराडे लिखित व दिग्दर्शित ‘कॅनल’, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबईतर्फे षण्मुखानंद आवटे लिखित/दिग्दर्शित ‘राडा’ व जिराफ थियेटर्स, टिटवाळा, मुंबईतर्फे राकेश जाधव लिखित व बॉबी दिग्दर्शित ‘चाप्लीन स्माईल’ या एकांकिका सादर होतील.
———–

पद्मश्री अशोक ‘मामा’ सराफ यांचा नागरी सत्कार कार्यक्रम पुढे ढकलला

गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनगर परिसरातील व्हॉलीबॉल मैदानावर आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण, पद्मश्री अशोक ‘मामा’ सराफ यांचा नागरी सत्कार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आ. संदीप जोशी यांनी दिली आहे.

‘मुख्यमंत्री महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या भव्य समारोपाच्या निमित्ताने हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत निर्माण झालेल्या अनपेक्षित कारणांमुळे कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही आ. संदीप जोशी यांनी सांगितले.