एल्गारवाल्यांनो

0

एल्गार वाल्यांनो तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा समाजाची दिशाभूल कराल पण सजग संविधानवादी तुम्हाला एक्स्पोज करतील…अनेकवेळा..

सुधीर ढवळे, हर्षाली आणि अर्बन गॅंग वाल्यांनो तुम्ही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या केंद्रीय माओवादी नेत्याचे उघड समर्थन व उदात्तीकरण करतात, त्यांच्यासाठी क्रांतीची गाणे म्हणतात, नक्षली चळवळीचे उघड समर्थन करणारी पुस्तके लिहितात मग तुम्ही आंबेडकरी कसे ? तुम्ही तर आंबेडकरी चळवळी ला बदनाम करत आहात.

मुंबईच्या श्रीधर श्रीनिवासन सह वर्णन गोंसालवेज आणि इतर काही लोकांना २००७ साली ATS ने सक्रिय माओवादी असल्याचा आरोप ठेवून अटक केली. श्रीधरला न्यायालयाने दोषी ठरवले. तो भारतीय कम्युनिस्ट पार्टी – माओवादी (CPI-MAOIST) या बंदी घातलेल्या जहाल डाव्या दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचे सिद्ध झाले. शिक्षा भोगून तुरुंगातून सुटल्यावर श्रीधरचा ऑगस्ट २०१५ दरम्यान हार्ट अटॅक ने मृत्यू झाला. तो CPI-MAOIST दहशतवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर असल्याचे उघड झाले. तसेच त्याची पत्नी सीमा हिराणी – श्रीनिवासन ही जहाल कार्यरत नक्षलवादी तरीही त्याच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तो गडचिरोलीच्या जंगलात नव्हे तर मुंबई मराठी पत्रकार संघात ऑक्टोबर ५, २०१६ रोजी झाला तसेच दरवर्षी अनुराधा गांधी ( मयत सेंट्रल कमिटी मेंबर – सी पी आय – मावोवादी) च्या स्मरणार्थ ही दरवर्षी अनुराधा गांधी च्या स्मरणार्थ ही ही सभा आयोजित करतात. यामध्ये एल्गार परिषद आयोजक हर्षाली पोतदार, सुधीर ढवळे सह एल्गार गुन्ह्यातील संशयित माओवादी आरोपी ऍड सुरेंद्र गडलिंग, वर्णन गोंसालवेज व इतर कार्यकर्ते सहभागी झाले आणि समता कला मंच चे कार्यकर्ते त्यांनी त्याठिकाणी मंचावर जाऊन गाणी सादर केली.

या हर्षालीची पोतदार ची उलट तपासणी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सुरु आहे. माओवादी नेता श्रीधरच्या स्मरणार्थ गाणी म्हणतानाचा हर्षालीचा फोटोच विवेक विचार मंच चे वकील ऍड प्रदीप गावडेंनी आयोगाला सादर केला. या फोटोमध्ये हर्षालीसह स्वतःला आंबेडकरी म्हणणारे तिच्या रिपब्लिकन पॅन्थर जाती अंतची चळवळ गटाचे कलाकार दिसतात. हर्षालीने आयोगासमोर फोटोमध्ये स्वतःला, गडलिंग, ढवळे व इतर कलाकारांना ओळखले. या फोटो मध्ये २०११ च्या कबीर कला मंच संबंधित नक्षलवादाच्या गुन्ह्यातील आरोपी अनुराधालाही हर्षालीने ओळखले.

ऑक्टोबर २०१६ दरम्यान पुन्हा एकदा श्रीधरच्या स्मरणार्थ मुंबईत कार्यक्रम झाला. याही कार्यक्रमात पुन्हा स्वतःला आंबेडकरी म्हणणारे हर्षाली, ढवळे व अन्य रिपब्लिकन पॅन्थर गटाचे कलाकार सहभागी झाले. त्याचाही फोटो आयोगापुढे सादर झालेला आहे. या फोटोत ही हर्षालीने आयोगासमोर स्वतःला ओळखले आहे. या कार्यक्रमात श्रीधरसंबंधित पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.

पुस्तकात एल्गार गुन्ह्यतील संशयित माओवादी अटक आरोपी आनंद तेलतुंबडेंचा लेख आहे. या लेखात तेलतुंबडेने “श्रीधर सारखे माओवादी हे आजच्या काळातील भगतसिंग” असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.( एक माओवादी दहशतवाद्याशी हुतात्मा भगत सिंग यांची तुलनाच होऊ शकत नाही. हा तर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा भगतसिंग यांचा अपमान आहे) या विधानाबद्दल हर्षालीची उलट तपासणी घेण्यात आली. त्यावर तिने गोलमाल उत्तरे दिली.

CPI-MAOIST दहशतवादी संघटनेचा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या नेत्याच्या स्मरणार्थ सलग दोन वर्षात दोन कार्यक्रम मुंबईत पार पडतात, त्यात एल्गार परिषद आयोजकांचा थेट सहभाग दिसून येतो.मग याना आंबेडकरी कसे म्हणावे ? हर्षाली, ढवळे, रिपब्लिकन पॅन्थर व कबीर कला मंच कलाकार हे एल्गार परिषद आयोजक समाजाची दिशाभूल करणारे खोटे आंबेडकरी आहेत हे स्पष्टच होते. मुळात हे सर्व संशयित जहाल डाव्या कम्युनिस्ट विचाराचे आहेत. महामानव डॉ आंबेडकरांचे अशा कम्युनिस्ट विचारसरणीच्या विरोधात होते.

उलट तपासणीत हर्षालीला CPI-MAOIST दहशतवादी संघटना संवैधानिक मार्गाने काम करते का? असा साधा प्रश्न विचारला. त्यावर – आपण असा काही अभ्यास केलेला नाही, असे गोलमाल उत्तर तिने दिले. विचार करा बांधवानो. सब गोलमाल है.

आता मात्र तुमची अर्बन गॅंग पूर्णपणे एक्स्पोज झाली आहे. तुमचे मास्टर माईंड म्होरके, तथाकथित विचारवंत, कलाकार जेलबंद झाले आहेत. गेले साडेतीन वर्षे न्यायालय त्यांना जामीन देत नाहीये.

सागर शिंदे
राज्य संयोजक, विवेक विचार मंच-महाराष्ट्र.