कापसाला १० हजार रुपयांचा भाव मिळावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची केंद्राकडे मागणी

0

नागपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा भाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. केंद्र सरकारचा सध्याचा हमीभाव प्रति क्विंटल 6 हजार 380 असा असून तो खूप कमी आहे. त्यामुळे या दरात १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची गरज असल्याची मागणी देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Minister Piyush Goyal) यांना पत्र लिहून केली आहे. सरकारने जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन कापसाच्या दरात वाढ करावी अशी मागणी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कापसाच्या दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत, असेही ते म्हणाले.

देशमुख यांनी पत्रात नमूद केलेय की, सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात (Cotton Prices) सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केली आहे. या हमीभावाला शेतकरी अपुरे किंमत म्हणत आहेत. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी कमी कापूस जात आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे

 

 

 

पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra