वर्धा. जिल्ह्यातील कारंजा घडगे (Karanja Ghadge) येथील एका धाडसी चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेत फारच रंजक माहिती समोर आली आहे. विहीणबाईँनीच मुलगा व इतरांना सोबत घेऊन व्याह्याकडे चोरीचा हा डाव साधला होता. या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक (Four accused arrested) करण्यात आली असून एका फरार आरोपीचा कसोशीने शोध सरू आहे. अशोक धुपचंद अग्रवाल यांच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख व दागिन्यांसह एकूण १४.८० लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर कारंजा शहरात एकच खळबळ उडाली होती. जवळच्याच व्यक्तीने चोरी केल्याचा संशय पूर्वीपासूनच पोलिसांना होता. त्याच शंकेनुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि आरोपींचे बिंग फुटले.
अशोक अग्रवाल यांच्या मुलाच्या सुनेच्या आईनेच तिचा मुलगा व इतर तिघांचे सहकार्य घेत आपल्याच व्याह्याच्या घरी नियोजनबद्धपणे चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी एकूण ७ लाख ५ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अंजना गोपाल अग्रवाल (४६), अनिश गोपाल अग्रवाल (१८), महेश बबन गाडवे (३०) तिन्ही रा. म्हसोला, ता. आणी, जि. यवतमाळ व दिलीप श्यामराव धोत्रे (४०) हमु. जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची, तर हेमंत पटेल (४०) रा. आर्णी, जि. यवतमाळ असे फरार आरोपीचे नाव आहे. सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा तसेच कारंजा पोलिसांनी समांतर तपास करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
आरोपींकडून चोरीच्या मालापैकी सोन्याचे तीन नेकलेस, दोन जोड सोन्याचे झुमके, कानातले सोन्याचे रिंग, सोन्याच्या बांगड्या, तीन जोड तोरड्या, पांढऱ्या धातूचे १७ शिक्के, पांढऱ्या धातूची सिंदूरदानी असा एकूण 7.05 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना उगडकीस आल्यास मुलीच्या संसारात अडचणी निर्माण होतील याची पुरेपूर जाणीव असूनसुद्धा विहिणबाईंनी व्याह्याकडे चोरी का केली. त्यांच्यावर चोरीची वेळ का ओढवली, मुलानेसुद्धा तिला का साथ दिली यासारखी प्रश्न अद्यापही अनत्तरीतच असून पोलिस तपास सुरू आहे
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra