नागपूर : गणेशपेठ बस स्थानक परिसरातील रॉय उद्योग समूहाच्या रजत संकुल इमारतीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय वीज बिल, थकीत भाडे यामुळे रिकामे करण्याची पाळी आल्याच्या वृत्ताने आज राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नागपूरसह पूर्व विदर्भात शिंदे गटाने आपले वर्चस्व वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला असताना या वृत्ताने शिवसैनिकांमध्ये काहीशी अस्वस्थता दिसली. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने पाच वर्षाचे रेंट एग्रीमेंट संपल्याने हे कार्यालय रिकामे करण्यात आले अशी माहिती देण्यात आली.
प्रसिद्ध उद्योजक किशोर राय यांच्या मालकीच्या रजत संकुल इमारतीत गेले काही वर्षे हे शिवसेनेचे विभागीय कार्यालय होते.संपर्कप्रमुख म्हणून तानाजी सावंत असताना या कार्यालयाचे धडाक्यात उद्घाटन झाले. त्यानंतर अनेक संपर्कप्रमुखांनी याच ठिकाणी बैठकांमधून शिवसेनेला मजबुती देण्याचा प्रयत्न केला असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटावर हे कार्यालय बंद करण्याची वेळ का यावी, हा प्रश्नच आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पाच वर्षांचे रॉय यांच्याशी रेंटल एग्रीमेंटवर हे कार्यालय आम्ही घेतले होते. आता ते संपले त्यामुळे चार महिन्यापूर्वीच हे कार्यालय आम्ही रिकामे करून दिले अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नितीन तिवारी यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाला गेल्या काही दिवसात येनकेन प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरू आहे. शिवसेनेचे रेशीमबाग परिसरात खूप वर्षापासून कार्यालय असून ते शिवसेनेच्याच नावावर आहे असा दावा तिवारी यांनी केला.
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra
https://youtu.be/S8gnBFeE7NE