अंनिसच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या

0

नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर आता त्यांच्या सहकाऱ्यांना देखील धमक्या येत आहेत, अशी माहिती अंनिसचे पदाधिकारी हरीष देशमुख यांनी (Andhashraddha Nirmulan Samiti) दिली. समितीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या दिल्या जात असून धमकी देणाऱ्यांचे आम्ही फोनवर प्रबोधन करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून धर्माच्या नावावर सुरु असलेल्या बुवाबाजी विरोधात आहोत, असेही ते म्हणाले. देशमुख म्हणाले की, अंनिस ही हिंदु धर्मविरोधी असल्याचे चित्र निर्माण करून लोकांच्या भावना भडविण्याचे काम सुरु आहे. त्यातून संतापलेले लोक आम्हाला व कार्यकर्त्यांना फोन करून शिवीगाळ व धमक्या देत आहेत. सोशल मिडियावर आमची बदनामी देखील केली जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अलिकडेच नागपूर शहर पोलिसांनी धिरेंद्र कृष्ण यांना क्लिनचीट दिली असून त्यांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम झाल्याचे कुठेही दिसलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.श्याम मानव यांनी नागपुरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे आव्हान दिले होते. नागपुरात रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तो वाद अद्यापही सुरुच आहे. श्याम मानव यांनी या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात श्याम मानव यांना धमक्या देण्यात आल्यावर नागपूर पोलिसांनी त्याची दखल घेत मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

 

 

पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra