भारतीय जमिनीवर १९६२ मध्येच चिनी घुसघोरी

0

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा
पुणे. भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi ) सातत्याने केंद्रातील मोदी सरकारला (Modi government) लक्ष्य करत आहे. भारतीय सीमाभागातील चीनच्या घुसखोरीवरूनही ते केंद्रावर घणाघाती आरोप करीत आहेत. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले होते. यावरून केंद्र सरकारचे चीन धोरण पूर्णपणे चुकले आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला होता. त्यांच्या आरोपांना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar ) प्रत्युत्तर दिले आहे. चीनने भारताच्या जमिनीवर १९६२ सालीच घुसखोरी केली होती. हे विरोधी पक्षातील लोक सांगणार नाहीत का, अशी विचारणा करीत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. भारत आणि चीन सीमेवर २०१७ साली तणाव निर्माण झाला होता. तेव्हा राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक झाल्याचे समोर आले होते. यावरूनही एस जयशंकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. जर मला चीनबद्दल काही जाणून घ्यायचे झाले, तर चीनच्या राजदूताकडे जाणार नाही. माझ्या देशातील लष्कर प्रमुखाकडे जाणार, असा टोलाही एस. जयशंकर यांनी लगावला. पुणे दौऱ्यादरम्यान ते बोलत होते

राहुल गांधींचा नेमका आरोप
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांत ९ डिसेंबरला झटापट झाली होती. यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. केंद्र सरकारचे चीन धोरण पूर्णपणे चुकले आहे. सरकारकडून लष्कराच्या मागे लपून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न होत आहे. पण, सीमेवर काय घडले ते सर्वांना सांगा. मी सरकारबद्दल काही भाष्य केले, तर लष्कराविरोधात बोललो असल्याचे सांगत दिशाभूल करण्यात येते, असे राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी आहेत. पण, चिनी घुसखोरी केल्याचे मान्य करत, चुकांची कबुली दिली पाहिजे. घुसखोरी झाली नसल्याचा दावा केल्याने चीनचे फावले आहे. चीन आणि पाकिस्तान आपल्याविरोधात एकत्र येत आहे, असा दावाही राहुल गांधींनी केला होता.

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा