
नागपूर (Nagpur), 9 जून 2026: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने महावितरणतर्फे मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अत्यावश्यक कामांसाठी बुधवारी, 10 जून रोजी शहरातील काही निवडक भागांत वीज पुरवठा काही तासांसाठी तात्पुरता खंडित राहणार आहे.
या नियोजित दुरुस्तीमुळे सकाळी 7 ते 11 या वेळेत काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर, सुभाष नगर, नेल्को सोसायटी, जोशी लेआउट, कामगार कॉलनी, तुकडोजी नगर, शास्त्री लेआउट, हिंगणा रोड, विवेक हॉस्पिटल, पटेल लेआउट, जयप्रकाश नगर 1 ते 5, सीता नगर, गोविंद नगर, महालक्ष्मी मंदिर, राजीव नगर, हायकोर्ट सोसायटी, गांगुली लेआऊट, खामला जुनी वस्ती, सिंदी कॉलनी, मिलिंद नगर, प्रताप नगर, रेल्वे कॉलनी, वंकटेश नगर, कोतवाल नगर, शांती निकेतन, शिवनगर आणि एन्सारा वाहिनी परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. तसेच याच विभागातील गोपाल नगर पहिला बस स्टॉप, जोशी वाडी, एसबीआय कॉलनी, दुसरा बस स्टॉप, जेतवन सोसायटी, दीनदयाल नगर, मिलानियम जिम, लोकसेवा नगर, जय बद्रीनाथ सोसायटी व इंद्रप्रस्थ सोसायटी या भागांत सकाळी 8 ते 12 या वेळेत वीज पुरवठा बंद असेल.
याशिवाय, सिव्हील लाईन्स विभागातील रविनगर, अंबाझरी पोलीस स्टेशन, सेनगुप्ता हॉस्पिटल, आशा लक्ष्मी अपार्टमेंट, युनिव्हर्सिटी ग्राउंड, सुभेदार हॉल येथे सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत, तर गिट्टीखदान व मंजिदना कॉलनी केसी अपार्टमेंट परिसरातही याच वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे. औद्योगिक क्षेत्राचा विचार करता, बुटीबोरी विभागातील एमआयडीसी उपकेंद्राच्या वाहिनी क्र. 10 वरील ‘बी’ झोन आणि वाहिनी क्र. 6 वरील ‘ई’ झोनमधील वीज पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत, तर ॲप्रिल पार्क उपकेंद्राच्या 11 केव्ही लॅमकेन वाहिनीवरील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्र. डी-1 ते डी-27 मधील वीज पुरवठा सकाळी 9 ते 12:30 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि तांत्रिक कामांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, वीज पुरवठा खंडित राहणाऱ्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर


















