महागाईचा तडका, सर्वसामान्यांची होरपळ

0

पीठ, तांदळासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, बजेटकडे लक्ष्य
नागपूर. वाढत्या महागाईने सर्वसामान्य मानूस भरडला जात आहे (Inflation is burdening the common man). जीवनावश्यक साहित्याचे दर गगनाला भिडत चाललेल्या दरवाढीने घरातील बजेट बिघडले असून, नववर्षात महागाईचा तडका बसला. इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिनी वापराच्या वस्तूंचे दरही दरदिवशी वाढत आहे. 31 जानेवारीला सादर सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटकडे (Union Budget ) आता सर्वसामान्यांचे लक्ष्य असून, यातून दिलासा मिळावा अशी अपेक्षा (Expect relief ) व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात प्रत्येक वस्तूंचे दर वाढते आहे. त्यामुळे सर्वसामान्य भरडले जात आहे. उत्पन्नाच्या तुलनेत होणाऱ्या खर्चाचा ताळेबंद आवाक्याबाहेर जात आहे. जगण्याचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होत आहे. आगामी वर्ष निवडणूकीचे असल्याने महागाई कमी करण्याची किमया सरकारला साधावी लागणार आहे.

 

धान्याच्या किंमतीने किचनमध्ये संताप
गेल्या दोन महिन्यात पीठाचे दर 20ते 25पर्यत वाढले ओह. बासमती तांदळाचे दर 15ते 20रूपये प्रति किलो वाढले. चन्याचे दरही 20 ते30रूपये प्रति किलोने वाढले. गव्हाची आवक घसरल्याने थोक व्यापाऱ्यांनीही दरवाढ होत असल्याचे मान्य केले. किचनमधून तुरीची दाळ नाहीशी होत आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवगींयांना बसत आहे. या प्रश्नांवर उत्तर शोधण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत आहे. तुरीची डाळ 115 ते 120 या दरावरून खाली येत नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकास दोनवेळचे जेवणही कठीण होत आहे.

 

दैनंदिन वस्तूही भडकल्या
पीठाचे दर 3 ते4रूपये प्रति किलो या दराने वाढले. गेल्या दोन महिन्यात प्रति किलो 28 रूपये या दराने विकला जाणारा गहू आज 32ते33 रूपये प्रति किलो या दराने विकला जात आहे. गेल्यावषीं गहू 27 ते 28 रूपये या दराने विकला जात होता. तो 40 रूपयापर्यंत पोहोचला आहे. गव्हाची आवक कमी असल्याने गहूचे दर वाढल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. सध्या बाजारात 32ते33रूपये प्रति किलो या दराने मैदा विकला जात आहे. तर, रव्याचा दरही प्रति किलो 33 ते ३५रूपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.

 

मासिक किराण्यावरील खर्च वाढला
सर्वसामान्य व मध्यमवगींय प्रत्येक महिन्यात किराणा खरेदी करतो.यात रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. तेल, जीर, साखर, तीखट, हळद, मसाले व इतरही वस्तूंचा यात समावेश आहे. आज हा किराणा खरेदी करतानाही खिशाला पीळ द्वयावा लागतो आहे. अगदी सर्वसाधारण व्यक्तींचा मासिक किराणा 3000 रूपयात पडायचा. तो आता5000 रूपयांपर्यंत गेला आहे. मागील महिन्यातच दीडशे रूपयात खरेदी केलेले शॉंपू दुसऱ्याच महिन्यात दोनशेवर गेला आहे. तेलही शंभराहून अधिक दर वाढले. डाळ, साखरचे दरही दुसऱ्याच महिन्यात वाढल्याचा अनुभव अनेकांना होतो आहे. तीन पिशव्या भरून घरी येणारा किराणा दरवाढीमुळे आता दोन पिशव्यात सामावून घेतला जात आहे.

असे वाढले दर (प्रति किलो)
पीठ 32 रूपये
मैदा 33 रूपये
रवा 35 रूपये
गहू 35 रूपये
तांदुळ 48 रूपये
बासमती तांदुळ 100 रूपये
तुरीची डाळ 115 रूपये
चना डाळ 70रूपये
चना 115 रूपये

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |