Home Artical Blog स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार नितीन गडकरी यांना

स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार नितीन गडकरी यांना

0

नागपूर(Nagpur):
नागपूर संशोधन, जनजागृती आणि विविध घटकांमधील समन्वय अशा दृष्टीने कार्यरत असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, नागपूर या स्वयंसेवी संस्थेतर्फे स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराची सुरुवात याच वर्षी होत असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. पायाभूत सुविधा, विकास आणि लोककल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १० मे २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता द बॅनियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे होणार असून, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
स्व. भाऊसाहेब चांद्रायण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या कायार्साठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन जगलेल्या भाऊसाहेबांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या प्रसंगी त्यांचे नातू डॉ. कपिल डी. चांद्रायण लिखित ‘सामान्यातील असामान्य भाऊसाहेब’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. सन २०२५ हे स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या प्रारंभाचे वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विकास, संशोधन आणि सार्वजनिक जीवन या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार सुरू करण्यात येत आहेत. समाजावर सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करणाऱ्या तसेच राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.