Home Artical Blog उन्‍नतीगृहातील आदिवासी विद्यार्थ्‍यांचे दहावीच्‍या परीक्षेत घवघवीत यश

उन्‍नतीगृहातील आदिवासी विद्यार्थ्‍यांचे दहावीच्‍या परीक्षेत घवघवीत यश

0

नागपूर(Nagpur), 9 मे:
मैत्री परिवार संस्‍था संचालित विद्यार्थी उन्‍नतीगृहातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी दहावीच्‍या परीक्षेत घवघवीत यश प्राप्‍त केले आहे. हर्षद मडावीने 86.20 टक्‍के गुण प्राप्‍त केले असून यश मोगरे – 84.80 टक्‍के, रोशन सरदार – 82.80 टक्‍के तर अंशुल आशा – 82 टक्‍के गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
हे विद्यार्थी गडचिरोली सारख्‍या आदिवासी भागातील गरीब कुटुंबातील असून मैत्री परिवार संस्‍थेच्‍या विद्यार्थी उन्‍नतीगृहात शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी पाचव्‍या वर्गापासून निवासाला आहेत.
राज हलामी, आयुष कोरामी व अनिकेत कुमोठी यांनी अनुक्रम 78.40 टक्‍के, 77 टक्‍के व 73.40 टक्‍के गुण प्राप्‍त झाले आहेत. अंशू मेश्राम, युगल बावनथडे व आदर्श शेट्टीवार हे विद्यार्थीदेखील या परीक्षेत उत्‍तम गुण घेत उत्‍तीर्ण झाले आहेत. बारावीच्‍या परीक्षेत हर्षित कामागुणी, कृष्‍णा कुमरे व योगेश कदम उत्‍तीर्ण झाले.
मैत्री परिवार संस्‍थेचे प्रा. प्रमोद पेंडके, प्रकाश रथकंठीवार, प्रा. विजय शाहाकार, डॉ. पिनाक दंदे, सुनील कुहीकर, समीर वझलवार, दिलीप ठाकरे, प्रा. अनिल यावलकर, प्रा. माधुरी यावलकर, मृणाल पाठक, स्‍वरूपा वझलवार, मनिषा गर्गे, रोहित ह‍िमते, बंडू भगत यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले आहे.