
चंद्रपूर(Chandrapur): आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह-2026 निमित्त जेसीआय चंद्रपूर पॉवरसिटीतर्फे दिनांक 11 मे 2026 रोजी लेफ्टनंट डॉ. सौ. वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज, चंद्रपूर तसेच विश्वानंद नर्सिंग कॉलेज, चंद्रपूर येथे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग व मेंटल हेल्थ नर्सिंग विभागासाठी तीन तासांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ही कार्यशाळा झोन ट्रेनर जेसीआय सिनेटर सोनम कपूर यांनी घेतली. कार्यक्रमाला डायरेक्टर मॅनेजमेंट जेसी सुहानी पोईंकर तसेच जेसी रिच्युअल नागराळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळा डॉ. व्हेनिस डेविड (प्राचार्य) आणि सौ. ऋतुजा झाडे (सहाय्यक प्राध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कार्यशाळेत 250 नर्सिंग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रभावी संवाद प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


यामध्ये मौखिक व अमौखिक संवाद, संवाद करण्यापूर्वी हेतू निश्चित करणे, आपल्या श्रोत्यांना समजून घेणे, आत्मविश्वास दर्शविण्यासाठी शरीराची ठेवण, हावभाव व अमौखिक संकेत, तसेच उत्तम संवादासाठी ज्ञान हा अपरिहार्य घटक असल्याची जाणीव करून देण्यात आली. शेवटी आउटपुट सत्राचे आयोजन करण्यात आले.
विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या माध्यमातून शाश्वत सिपिंगला प्रोत्साहन देण्यात आले. हा उपक्रम “स्ट्रीट्स टू सोसायटी” या संकल्पनेच्या दिशेने एक सकारात्मक प्रयत्न ठरला.
यावेळी विद्यार्थ्यांना जेसीआय विषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच सामुदायिक प्रकल्पांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

















