नागपूर : पाच वर्षांपूर्वी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या हत्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांनी आरोपी दीपक गिले यास आज जन्मठेपची शिक्षा सुनावली . पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत मौजा साईधाम समाज भवन नंदजी नगर येथे ही खुनाची घटना 2018 साली घडली. १ जून २०१८ च्या रात्री मृतक चंद्रशेखर यादव हा रक्ताच्या थारोळयात साईधाम समाजसमोर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रणव भोहरे आणि मृतकांचे वडील शिवपुजन यांनी सेंट्रल एव्हेन्यू चांडक हास्पीटल नागपूर येथे भरती केले.मृतकावर उपचार सुरु असताना २० दिवसानी त्याचा मृत्यू झाला .
फिर्यादी प्रणव भोहरे यांच्या 2 जून 2018 रोजी रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार भांदवी ३०७ नुसार दीपक गिले आणि महेश मांडले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चंद्रकांत यादव यांच्या मृत्यूमुळे कलम ३०२ भांदवी नुसार आरोपी विरुध्द आरोप पत्र दाखल केले गेले. न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांच्या कोर्टात सहाय्यक सरकारी वकील वर्षा सायखेडकर यांनीएकुण १२ साक्षीदार तपासले. मृतकाने दिलेली मृत्यूपूर्व जबानी कोर्टाने ग्राहय धरुन आरोपी दिपक गिले यांस कलम ३०२ भादवी नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पी.आर .फुलझले यांनी केला.