गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर येत असून शुक्रवार, 17 फेब्रुवारी रोजी त्यांचे नागपुरात आगमन होत आहे. त् उद्या सायंकाळी 7.30 वाजता फुटाळा येथे म्युझिकल फाउंटन आणि लाईट शोचा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने आयोजित या ट्रायल शोला गृहमंत्री अमित शहा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या म्युझिकल फाउंटेन शोला जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत लाभलेले असून बीग बी अमिताभ बच्चन, प्रख्यात गीतकार-दिग्दर्शक गुलजार व मराठीतील अतिशय लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची कॉमेंट्री आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या ट्रायल शोच्या पासेस ना.नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ, खामला, नागपूर येथून सकाळी 12 वाजेपासून प्राप्त करता येतील.