मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग

0

चंद्रपूर (Chandrapur) : मौजा उदापूर, ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील रामदेव बाबा Solvents – RBS या इथेनॉल प्लँटमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. प्लँटमध्ये सुमारे 1.25 लाख लिटर इथेनॉलचा साठा असल्यामुळे आगीने वेगाने भीषण रूप धारण केले आहे. विशेषतः डिस्टिलेशन प्लांटचा भाग सर्वाधिक प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे.

आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायर ब्रिगेडचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि मूल येथील फायर ब्रिगेड पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच अतिरिक्त मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड वडसा येथून पोहोचल्या असून, चंद्रपूर महानगरपालिकेकडून दोन फायर टेंडर फोम सोल्यूशनसह रवाना करण्यात आले आहेत.

सुदैवाने सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. तरीही इथेनॉल साठ्यामुळे आगीचे आव्हान अधिक मोठे असल्याने नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.