देशातील 200 कुलगुरूंकडून राहुल गांधींचा निषेध

0

नवी दिल्ली, 06 मे : देशातील सर्वच विद्यापीठांचे कुलगुरू अपात्र असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्याविरोधात देशभरातील सुमारे 200 कुलगुरूंनी संयुक्त निवेदन जारी करत राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केलीय. (Rahul Gandhi’s statement protested by 200 Vice-Chancellors)

बेताल विधानासंदर्भात कायदेशीर कारवाईची मागणी


नागपूर येथे आयोजित काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिन समारंभात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंबाबत मोठे वक्तव्य केले होते. देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू अपात्र आहेत. यांना काहीच येत नाही. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेचे म्हणून यांची निवड झाली आहे. हे फक्त त्यांच्या विचाराचे पाईक असल्याने त्यांची निवड झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. होती. या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच सुमारे 200 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एकत्र येत एक संयुक्त निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. संयुक्त निवेदनात कुलगुरू आणि इतर वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य फेटाळून लावले आहेत. गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कुलगुरू आपल्या कामात संस्थांचा सन्मान आणि नैतिकतेची काळजी घेतात. जागतिक क्रमवारीवर नजर टाकली तर भारतीय विद्यापीठांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत, असेही म्हटले आहे. दरम्यान, संयुक्त निवेदन असलेल्या निवेदनावर 180 कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, एनसीआयआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, एआयसीटीई, यूजीसी इत्यादी प्रमुखांचाही समावेश आहे.