3ऱ्या इंटरनॅशनल कॅन्सर केअर कॉन्फरन्स -“कॅन रिहॅब” मध्ये प्रमाणपत्र प्राप्त

0

एच‌सीजी कॅन्सर सेंटर ‌नागपूर (HCG)सोबत काम करणाऱ्या मानसशास्त्रज्ञ कॅन्सर समुपदेशक डॉ.कमलजीत कौर यांनी नुकतेच तिचे “जेरियाट्रिक कॅन्सर केअर अँड इंटरव्हेंशन्स अँड रिहॅबिलिटेशन” हे 3ऱ्या इंटरनॅशनल कॅन्सर केअर कॉन्फरन्स – “कॅन रिहॅब” मध्ये प्रमाणपत्र प्राप्त केले . डॉ. सौ. मॅकेन्झी परगलोटी या‌ युनायटेड‌ स्टेट्स ऑफ अमेरिका मधील एक जेरियाट्रिक थेरपिस्ट प्रॅक्टिशनर असून तिच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

तिला या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजक प्रमुख डॉ.रेबेका मारीच्या हाताने कर्करोग पुनर्वसन मध्ये सुद्धा एक प्रमाणपत्र देण्यात आले. या परिषदेत जगभरातून ३०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. ऑरेंज सिटी नागपूरसाठी हा सर्वात अभिमानाचा क्षण आहे की डॉ. कमलजीत कौरने आमच्या शहराचे आंतरराष्ट्रीय कॅन्सर केअर प्लॅटफॉर्मवर प्रतिनिधित्व केले आणि प्रत्येकासाठी स्टार्स मिळवले .गेल्या 8 वर्षांहून अधिक काळ ती कॅन्सरची काळजी आणि पुनर्वसनासाठी सतत काम करत आहे.