
अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, यात सरनाईक यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वाशिमवरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडी आमने-सामने आल्याने जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर शहरालगत दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात घडला. आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात असल्याची माहिती पुढे आली आहे.
मरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील सदस्याचा देखील मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्याघडीला जखमींना अकोला येथे उपचार्थ हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तर पुढील कारवाई पोलीस करत असून या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















