Home Top News सिव्हील लाईन्स परिसरात आज वीज नाही!

सिव्हील लाईन्स परिसरात आज वीज नाही!

0

नागपूर(Nagpur), दि. 21 मे 2026: मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या, शुक्रवार 22 मे रोजी सिव्हील लाईन्स विभागातील आकारनगर, वायुसेना आणि क्लार्क टाऊन या तीन वीज वाहिन्यांवरील भागांचा वीजपुरवठा सकाळच्या सत्रात खंडित राहणार आहे.

या कामांउळे सकाळी 7 ते 10 या वेळेत आकार नगर, पायोनियर ग्रीन, स्वामी कॉलनी, रचना सोसायटी आणि अनुपम सोसायटी परिसर, सकाळी 7 ते 11 या वेळेत सिंधी कॉलनी, कडबी चौक, क्रिश्चन कॉलनी, लुंबिनी नगर आणि क्लार्क टाऊन परिसर. तर सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत गांधी लेआउट, श्याम लॉन, संगम नगर, सूरज नगर, काळबांडे हॉस्पिटल आणि बसेरा अपार्टमेंट परिसरातील वीजपुरवठा बंद राहील

या काळात नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरी नागरिकांनी वीज बंद होण्यापूर्वी आपली महत्त्वाची घरगुती व व्यावसायिक कामे आटपून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर