या शहरातील सिग्नल या वेळेत राहणार बंद

0

अमरावती,(Amravti ) 5 मे
मे महिन्यात उन्हाचा पारा दिवसोंदिवस वाढतच असल्यामुळे ट्राफिक सिग्नलवर दुचाकीस्वारांना अक्षरशाः उन्हाचे चटके बसत असल्यामुळे शहरातील सिग्नल दुपारी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती ती मागणी रास्त असल्याने पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी (Commissioner of Police Navinchandra Reddy)यांनी शहरातील सर्व ट्राफिक सिग्नल दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत बंद आदेश जारी करण्यात आले आहे.

मे महिन्यात सूर्य आग ओकू लागल्यानेउन्हाळा पारा सरासरी ४४ ते ४७ अंशापर्यंत तापत आहे. दुपारी बाहेर जाण्याच्या विचाराने नागरिकांमध्ये थरकाप उडत आहे. तरी देखील कामानिमित्त लोकांना बाहेर पडावेच लागते. अशातच ते ट्राफिकसिग्नलवर दोन मिनिटे थांबले की कडक उन्हात त्यांना चटके सहन करावे लागतात.त्यामुळे शहरातील सर्व सिग्नल दुपारी बंद ठेवावे, अशी मागणी माहिती अधिकार महासंघाचे योगेश पखाले यांनी शहर वाहतुक विभाग व पोलीस आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली होती. योगेश पखालेंची मागणी एकदम रास्त असल्याने सीपी रेड्डींनी क्षणाचाही विलंब न करता शहरातील ट्राफिक सिग्नल दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.