माहूरगड येथून प्रज्वलित केलेली अखंड ज्योती नागपुरात दाखल

0

परशुराम सर्व भाषी ब्राह्मण संघ महिला मंडळाने आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवत श्री रेणुका माता मंदिर, माहूरगड येथून प्रज्वलित केलेली अखंड ज्योती रविवारी सायंकाळी ७ वाजता नागपुरात दाखल झाली.

ही पवित्र अखंड ज्योती दर्शनासाठी नागपूर शहरात ठिकठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत चालेल. श्री रेणुका मातेची अखंड ज्योती कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला त्यांच्या घरी किंवा संस्थेत किंवा मंदिरात दर्शन व पूजेसाठी घेऊन जायची असल्यास ज्योतीच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
श्री परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात व मिरवणुकीत श्री रेणुका माता अखंड ज्योती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.