
नागपूर(Nagpur), दि. 17 एप्रिल 2026: महावितरणच्या वाठोडा वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या 11 केव्ही न्यू वाठोडा वाहिनीवर काही तातडीची आणि अकस्मित कामे उद्भवली आहेत. या तांत्रिक कामांच्या दुरुस्तीसाठी शनिवार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी वाठोडा आणि परिसरातील अनेक भागांचा वीज पुरवठा सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
या नियोजित वीज कपातीमुळे फटका वाठोडा चौक, सुभद्रा हाईट, जयराम रेसिडेन्सी, अनमोल नगर आणि ऑरेंज नगर या भागांना बसणार आहे. तसेच लोककल्याण सोसायटी, साईबाबा नगर, चैत्यनेश्वर नगर, राधाकृष्ण नगर, मा भवानी नगर, जय जलाराम नगर, शारदानगर, मानसी आणि नागपूर हाऊसिंग सोसायटी यांसह संबंधित इतर परिसरातील वीज पुरवठा चार तास खंडित राहील.
यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित भागातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवणे, मोबाईल व इतर उपकरणे चार्ज करणे यांसारखी आवश्यक कामे सकाळी 8 वाजेपूर्वीच उरकून घ्यावीत आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

















