Home Artical Blog नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटीत शाळांना सुट्टी जाहीर

नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटीत शाळांना सुट्टी जाहीर

0

नागपूर(Nagpur), १७ एप्रिल २०२६: भारतीय हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी Yellow Alert जाहीर केला आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता असून, सध्या जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस यांना दिनांक १८ एप्रिल २०२६ (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देतांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकाचा आधार घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.