Home Artical Blog चंद्रपूर मनपातील महिला-बालकल्याण व झोन समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

चंद्रपूर मनपातील महिला-बालकल्याण व झोन समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

0

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेत पार पडलेल्या महिला व बालकल्याण तसेच झोन समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनपातील काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते राजेश अडूर यांच्या नेतृत्वात पार पडल्या.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या नगरसेविका सुनीता जयस्वाल यांचा पराभव केला. उपसभापतीपदी सईदा शेख यांची निवड करण्यात आली.दरम्यान, झोन समिती निवडणुकीतही काँग्रेसने आपली ताकद दाखवत झोन क्रमांक २ आणि ३ मध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले. झोन क्रमांक २ मधून वैशाली चंदनखेडे यांची बिनविरोध निवड झाली, तर झोन क्रमांक ३ मधून रामनरेश यादव विजयी झाले.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकजुटीचे दर्शन घडवत सर्व पदांवर विजय मिळवला. या यशात काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले, तर राजेश अडूर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

 

#BreakingNews #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #Congress #MunicipalElection #WomenEmpowerment #IndianPolitics #VidarbhaNews #PoliticalNews #NariShakti #LocalNews #ElectionUpdate #ViralNews

———————————————————-