ग्रामीण भागात दहा हजार ई-बसेस

0

नवी दिल्ली NEWS DELHI  30 ऑक्टोबर  : देशभरातील ग्रामीण भागाची कनेक्टिव्हीटी बळकट करण्यासाठी आता 10 हजार ई-बसेस सुरू करण्यात येणार आहेत. या बसेस खेड्यांना त्यांच्या जिल्ह्यातील शहरांशी जोडणार आहेत. या बसेसमुळे  BUS 50 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता असल्याचे रस्ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशभरात जिल्हा मुख्यालये व त्यांच्या आसपासच्या खेड्यांना इलेक्ट्रिक बसेसने जोडले जाईल. यामुळे या शहरांची वाहतूक व प्रदूषणाची समस्या कमी करण्यास मदत मिळेल. पहिल्या टप्प्यात पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत 29 शहरांना जोडले जाईल. रस्ते परिवहन मंत्रालयाचे एक अधिकारी म्हणाले, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या एका संशोधनानुसार, छोट्या व मध्यम शहरांत वाहतूक-प्रदूषणाची समस्या वाढत आहे. यात देशातील विविध राज्यांतील 84 शहरे-खेड्यांचा समावेश आहे. त्यांचे एकमेकांपासून अंतर 40 ते 70 किलोमीटर आहे. या योजनेसाठी 57 हजार 613 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असून यातून 10 हजार ई-बसेस चालवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेची सुरुवात 3 हजार बसेसने याच वर्षी होईल. यात उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालची 29 शहरे निवडण्यात आली आहेत.