पेंचमधील वाघाच्या शिकार प्रकरणाला अंधश्रद्धेची किनार!

0

एकूण 7 आरोपी अटकेत : कवटी वाघनखे घस्तगत

नागपूर. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात (Pawni Buffer Forest area of Pench Tiger Reserve ) वाघाच्या शिकारीची (Tiger hunting) घटना 12 जानेवारीला उघडकीस आली होती. या प्रकरणात आतापर्यत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाघाची कवटी, वाघनखे यासारखे अवयव जप्त करण्यात आले आहे. 5 आरोपी वनकोठडीत असून दोघांची न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी करण्यात आली आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची हत्या अंधश्रद्धेतून झाली असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. आरोपींपैकी जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. आजपर्यंत झालेल्या तपासात आरोपींनी विजेच्या तारांचा करंट लावून वाघाची शिकार केल्याचे व नंतर मृत शरीर कापून पंजे, कवटी, मिश्या, काही हाडे व दात काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघाच्या अवयवाचा वापर अंधश्रध्देच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी केला असण्याची तसेच इतरांना विक्री केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात अजून काही शक्यता पडताळण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील तपास ए. श्रीलक्ष्मी, सहायक वन संरक्षक अतुल देवकर आणि जयेश तायडे यांच्यासह अन्य कर्मचारी करीत आहेत. कायदेविषयक बाबतीत विधी सल्लागार कवीता भोंडगे यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. अनेकदा तारुण्य आणि जोश प्राप्तीसाठी वाघाची शिकार केली जाते. या प्रकरणी असे काही आहे का? या दिशेने तपास करण्यात येणार आहे.

प्लेबॉय’चा समावेश
वाघ शिकार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी एकाची ऑनलाईन वेबसाईट वरती “प्लेबॉय” म्हणून नोंदणी असल्याने या प्रकरणात अजून काही शक्यता पडताळण्यात येत आहेत. वाघाच्या अवयवाचा वापर अंधश्रध्देच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी केला असण्याची तसेच इतरांना विक्री केल्याची शक्यता आहे. वन विभागाच्या पथकांकडून सर्वच शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत.

 

 

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|