
पुणे : शेतीसाठी, बागकामासाठी वापरले जाणारे प्रमुख हत्यार म्हणजे कोयता. आता कोयता खरेदी करायचा असेल तर आधाडी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुण्यात पोलिसांनी हा नियम लागू केला (Pune Koyata Gang) आहे. त्यामागील कारणही तेवढेच महत्वाचे आहे. पुण्यात कोयता गँगने नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यापायी पुणे पोलिस हैराण असून कोयता गँगच्या कारवाया नियंत्रणात आणण्यासाठीच पोलिसांनी आधार कार्डचा नियम लागू केला आहे. पुण्यात कोयता घेऊन दहशत माजविणे, खंडणी वसूल करणे, धमकावण्याचे प्रकार पुण्यात अद्यापही सुरुच असल्याने पोलिसांनी आता हा उपाय शोधल्याचे सांगितले जाते. कोयता खरेदी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडून विक्रेत्यांना आधार कार्डची प्रत घ्यावी लागणार आहे.
मागील काही महिन्यात कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना पुण्यात वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कोयता गँगची दहशत असून ती मोडून काढण्यासाठी पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या गुंडांची धिंडही काढली. मात्र, या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी कोयत्याचा गैरवापर टाळण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे. विक्रेत्यांना देखील कोयता खरेदी करणाऱ्याकडून आधार कार्ड घेण्यास सांगण्यात आले आहे. हत्यारे पकडून देणाऱ्यांना पुणे पोलिस बक्षिसे देणार आहेकोयता गँगच्या दहशतीपायी शहरातील व्यापारी वर्ग देखील त्रस्त आहे. कोयत्याचा धाक दाखवून लुटमारीच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. पोलिस महासंचालकांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी विशेष पथके नेमून कोयता गँग मधील अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.