माजी ZRUCC सदस्य डॉ. प्रवीण डबली यांच्या सूचनांचा समावेश
नागपूर :अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या. नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लातूरमध्ये वंदे भारत ट्रेनची निर्मिती कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात 14 डिसेंबर 2022 रोजी माजी ZRUCC सदस्य डॉ. प्रवीण डबली यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी सुचवले होते की, 400 वंदे भारत ट्रेन वेळेवर चालवायच्याअसतील, तर केवळ चेन्नई वर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील अमरावती येथे वंदे भारत ट्रेन निर्मितीचा कारखाना उभारला जावा. याविषयीची घोषणा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वंदे भारत ट्रेनच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील लातूर, हरियाणातील सोनीपत आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे कोच कारखाने उभारण्यास मंजुरी दिली आहे. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयाचे डबली यांनी स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पात ब्रॉडगेज मेट्रोलाही मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्पात ब्रॉडगेज मेट्रोचे नाव बदलून वंदे मेट्रो ट्रेन करण्यात आले आहे. या ब्रॉडगेज मेट्रोची सूचनाही प्रवीण डबली यांनी 2014 मध्ये नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना दिली होती. नागपूर शहराला नजीकच्या शहरांशी जोडण्यासाठी आणि अप-डाऊनचे काम करणाऱ्या प्रवाशांसाठी जलद पॅसेंजर चालवावी, असे म्हटले होते. ज्याला पुढे गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रो असे नाव दिले.आता 2023 च्या बजेटमध्ये तिला वंदे मेट्रो ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. 2011-12 मध्ये ZRUCC सदस्य असताना डॉ. प्रवीण डबली यांनी SECR चे तत्कालीन महाव्यवस्थापक अरुणेंद्रकुमार यांना अशा शहरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या धर्तीवर ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला होता. वंदे मेट्रो ट्रेन असा अर्थसंकल्पात समावेश करून ही सूचना एक प्रकारे मान्य करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवीण डबली यांनी रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.