(Jalna)जालना – पाल असलेल्या बाटलीतील पाणी प्यायल्याने एका मुलीला विषबाधा झाल्याची घटना जालना शहरात घडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचार्या प्रशिक्षण केंद्रात ही घटना घडली. पाण्याच्या बाटलीत पाल असल्याचे समजल्यानंतर एका मुलीने ही माहिती इतर मुलींना दिली. या घटनेची माहिती ऐकून चार जणींना मळमळ, उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. ही माहिती परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने या मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या चारही मुलींची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.