सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद

0

 

खूप मोठा हलगर्जीपणा – सुप्रिया सुळे (Supriya Sule)

पुणे,(Pune) 13 मे  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी राजकीय वादंग कायम असल्याचं चित्र आहे. कारण आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत बारामतीतील ईव्हीएम जिथं ठेवण्यात आले आहेत त्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही कॅमेरे ४५ मिनिटे बंद होते, असा आरोप केला आहे.त्यानंतर सुळे यांनीही यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

“बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. ईव्हीएमसारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट जिथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत,” असा आरोप सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, “सदर स्ट्राँगरुमच्या ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करू दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला याची कारणे जाहीर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा