Supreme court : सुनील केदारांना दिलासा नाहीच

0
Supreme court : सुनील केदारांना दिलासा नाहीच

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपूर (Nagpur) :- विदर्भातील काँग्रेस नेते आणि सावरनेरचे अपात्र आमदार सुनील केदार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यातील दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने सुनील केदार यांना सध्या दिलासा मिळालेला नाही. मात्र जिल्हा न्यायालयाने केदार (Sunil Kedar) यांच्या याचिकेवर सप्टेंबर अखेरपर्यंत आपला निकाल द्यावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.

देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणूक लढविण्याची माजी मंत्री सुनील केदार यांची इच्छा सध्यातरी पूर्ण होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी सकाळी न्या. उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाआहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे केदार यांची विधानसभा लढण्याची दारे बंद झाली आहेत.

Nagpur in marathi
Nagpur wikipedia
Nagpur which state
nagpur.gov.in application form
NMC Nagpur property tax receipt
Nagpur in which state in Map
Index number for property tax Nagpur
Nagpur map