सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली(New Delhi), 13 मे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई बोर्ड) आज सोमवारी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

सीबीएसई बोर्डच्या 12च्या परीक्षेसाठी या वर्षी 16,33,730 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर, 14,26,420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 50 टक्के आहे.

सीबीएसईचा निकाल इथं तपासा

सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in ही अधिकृत वेबसाइट असून या लिंकवर जाऊन क्लिक करा. यानंतर आपला रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडीमध्ये प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट करा आणि तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. तसेच निकाल डाउनलोड करुन त्याची प्रिंटही काढू शकता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा