गोशाळांच्या बचावासाठी मुंडेंची बदली करा | ias tukaram mundhe transfer

0

मागण्या लवकर मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन

महाराष्ट्र गोसेवा आयोगाला अद्याप अधिकार आणि कर्मचारी मिळाले नाहीत. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी वितरित झाला नाही. त्यामुळे पशुसंवर्धन सचिव श्री. तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करण्यात यावी. गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिन ₹100 चारा अनुदान द्यावे. संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी राज्यभरातील गोशाळाधारकांनी केली आहे. (ias tukaram mundhe transfer)

महाराष्ट्र शासनाने गोशाळांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना आणि गोमय मूल्यवर्धन योजना सुरू करण्यात आल्या. 182 गोशाळांची निवड करण्यात आली आणि निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पशुसंवर्धन सचिव श्री. तुकाराम मुंडे यांच्या अडचणीमुळे निधी वितरित झाला नाही.
गोसेवा आयोगाला अद्याप अधिकार आणि कर्मचारी मिळाले नाहीत. यामुळे महाराष्ट्रातील गोशाळांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

गोशाळांच्या मागण्या:
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करा.
गोसेवा आयोगाला कर्मचारी आणि अधिकार द्या.
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना गोसेवा आयोगाद्वारे राबवा.
सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिन ₹100 चारा अनुदान द्या.
संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा.
पशुसंवर्धन सचिव श्री. तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करा.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून टाका.

गोशाळा महासंघाने या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
गोशाळांच्या मागण्या लवकर मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.