इंडिगो विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

0

नागपूर : नागपूर ते मुंबई जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन दरवाजे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा भांदवि 336 तसेच एअरक्राफ्ट कायदा 1937 अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .ही घटना 24 जानेवारीची आहे. नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे 6e 5274 हे विमान मुंबईकडे सकाळी 11.05 वाजता झेपावले. हे विमान मुंबई विमानतळावर 12.30 च्या सुमारास उतरत असताना विमानाचे आपातकालीन दरवाजे कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देश वैमानिकाला मिळाले. तातडीने यावरून कॅबिनमधील सहकर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडण्यात आल्याचे निदर्शनास आले .सुदैवाने ही घटना विमान उतरताना लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.यानंतर या प्रवाशाविरुद्ध तक्रार देण्यात आली वैमानिक, सहवैमानिक आणि सह प्रवाशांची बाजू ऐकून घेण्यात आल्यानंतर संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी देखील चेन्नई ते तिरुचिरापल्ली प्रवासादरम्यान अनवधनाने विमानाचे इमर्जन्सी एक्झिट डोअर उघडण्याचा प्रकार गतवर्षी डिसेंबर महिन्यात घडला होता

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |