फुटाळा फाउंटेनचे उदघाटन करणार पंतप्रधान

0

नागपूर :फुटाळा तलावात नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने साकारण्यात आलेल्या विक्रमी संगीत कारंजाचे उदघाटन येत्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यासोबतच विविध कामाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे.मुंबईत देखील दुसऱ्यांदा पंतप्रधान जाणार आहेत . यापूर्वी समृद्धी महामार्गाचे उदघाटनासाठी पंतप्रधान आले होते. सायन्स काँग्रेसचे त्यांनी ऑनलाइन उदघाटन केले. मागील नागपूर दौर्‍यात पंतप्रधानांनी फुटाळा कारंजाचे उदघाटन करण्याबाबत संकेत दिले होते. आता पंतप्रधान मोदी फेब्रुवारी महिन्यात नागपूरला येण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमासाठी नागपूरचा इतिहास डब करणारे महानायक अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात येत आहे. याशिवाय संगीतमय कारंजासाठी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत आहे. त्यांनीदेखील उदघाटनाला उपस्थित राहावे, असा प्रयत्न सुरू आहे. हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कारंजे पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही नागपूर दौऱ्यात म्युझिकल फाउंटेन पाहून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनचे कौतुक केले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर, निमंत्रित यांचेसाठी या संगीतमय कारंजाचे ट्रायल शो आयोजित करण्यात आले

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |