सकल हिंदू समाजाचा मुंबईत जनआक्रोश मोर्चा

0

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी

मुंबई. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Jan Aakrosh Morcha) काढण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून (Dadar’s Shivaji Park ) सुरू झालेला हा मोर्चा प्रभादेवीतील (Prabhadevi) कामगार मैदानापर्यंत जाईल. अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते मोर्चात सहभागी झाले आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्याची या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. या मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि प्रत्यक्ष काही पीडितासुद्धा सहभागी झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलाच या मोर्चाचे नेतृत्व करीत असल्याचे दिसून येत आहेत. महिलांचा लक्षणीय सहभाग दिसत आहे.

 

मोर्चा सुरू झाला त्यातुलनेत वाटेत मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत आहे मोर्चा पुढे प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी एक सभा देखील होणार आहे. जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा देण्यात येत आहे. देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दरवेळी त्यावर आवाज उठविला जातो. मात्र काही दिवसांनी प्रकरण शांत होते. श्रद्धा वालकर हत्येमुळे संपूर्ण देश हादरुन गेला. ही घटना समोर आल्यानंतर देशाच्या विविध भागातून अशा घटना समोर येत आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीने जोर धरला आहे. याशिवाय देशात बेकायदा धर्मांतरनाच्याही घटना समोर येत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजामार्फत केली जात आहे. आज सकल हिंदू समाजाकडून मुंबईत काढण्यात येणाऱ्या या हिंदू जन आक्रोश मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा