राष्ट्रवादीचे पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे गायब!

0

मुंबई mumbai -राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड  Jitendra Awhad यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार  Sharad Pawar गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले असल्याची माहिती त्यांनी दिली असल्याचे समोर आले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडली.. राष्ट्रवादीच्या प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे.

पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शरद पवार गटाच्या वकिलांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांना काही प्रश्न विचारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीसंबंधी विचारण्यात आले असता निवडणुका झाल्या असल्या तरी त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपटात ठेवण्यात आली होती व ती गायब झाल्याची धक्कादायक माहिती आव्हाडांनी दिली. आव्हाड यांनी सांगितले की, ती कागदपत्रे एका गुप्त कपाटात ठेवली गेली होती. मात्र, त्या कपाटाची जबाबदारी ज्यांना देण्यात आली, त्या दोन माणसांनी ती गहाळ केली. ती लोक पक्ष सोडून गेली आहेत, असा दावाही त्यांनी केला.