
पुणे pune – लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली असताना congress काँग्रेसच्या विभागीय बैठका सुरु आहेत. बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नावर ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण c यांनी आक्षरशः हात जोडले. एक प्रकारे आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास अजिबात उत्सूक नाही, असे चव्हाणांनी आज सांगून टाकले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पृथ्वीराज चव्हाण हे कोठूनही लढल्यास जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त करत वेळ मारून नेली. मविआ राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना चेन्नीथला यांना वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य प्रवेशाबाबत विचारले असता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी सोबत घेण्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सोबत घेण्यासची सहमती असून त्या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.