भाजप-शिंदे गट की मविआ? विधान परिषदेसाठी जनतेचा कौल कुणाला?

0

नागपूर : राज्यात गेल्यावर्षी जून महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्यावर एकाचवेळी विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्या (Legislative Council Elections 2023) आहेत. नाशिक, अमरावती पदवीधर तसेच नागपूर, औरंगाबाद आणि कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे गट तसेच महाविकास आघाडीची परीक्षा होणार असून जनता नेमकी कोणाला पास करणार, याचा फैसला आज होणार आहे. दोन्ही राजकीय आघाड्यांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. राज्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने विधान परिषदेचे हे निकाल अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. पाचही मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत या मतदारसंघातील कल स्पष्ट होईल, असे संकेत मिळत आहेत.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात त्रिकोणी लढत असून भाजप समर्थित नागो गाणार हॅटट्रीक साधणार की परिवर्तन घडणार, याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत आहे.
राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष लढणारे सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्याच मुख्य लढत असून सत्यजीत तांबे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विजयाची पोस्टर्स देखील मतदारसंघात लागलेली आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे. तर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत असून विक्रम काळे पुन्हा बाजी मारणार काय, याकडे लक्ष लागले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात मविआ आणि भाजप अशी थेट लढत आहे. मविआचे बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा